प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत खरेदीदार व विक्रेते संमेलन

वर्धा/प्रतिनिधी जिल्हा अधीक्षक कृषी योजनेंतर्गत खरेदीदार व विक्रेते संमेलन अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने धान्य व मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत खरेदीदार आणि विक्रेते सम्मेलन घेण्यात आले. यात निर्यातदार व विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संमेलनात तामिळनाडू राज्यातील भाजीपाला, डाळ आणि मसाले निर्यातदार संजीव मोहन, आंध्रप्रदेशातील विजय के.पी. तसेच नागपूर येथील निर्यातदार अन्नछत्र इंटरनॅशनलचे संचालक विश्वजीत रघाटाटे तसेच वर्धा पीएमएफएमइचे योजनेचे लाभार्थी उद्योजक राजेंद्र व रोहन कावळे यांनी सहभाग घेतला होता. या संमेलनातील चर्चेदरम्यान निर्यातदारांनी जिल्ह्यातील वायगाव हळदीची विशेष मागणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे गहू, गव्हाची कणिक, डाळी यांना सुद्धा काही आशियाई देशांमध्ये मागणी असुन त्याकरिता शेतकऱ्यांनी त्या देशांच्या मागणीनुसार क्लिनिंग आणि ग्रेडिंग करुन धान्य विक्री करणे आवश्यक आहे. आपल्या शेतमालाचे क्लिनिंग आणि ग्रेडिंग जर बरोबर केल्या गेले नाही तर आपल्याला भाव मिळत नाही असे सांगितले. राष्ट्रीय स्तरावर दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, मद्रास या मोठ्या शहरांमध्ये वायगाव हळद आणि गहु कणिक यांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आपण आपल्या शेतकऱ्यांना या शहरांमध्ये सुद्धा विक्रीची संधी उपलब्ध करुन देऊ शकतो.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे लाभार्थीउद्योजक विलास हिवंज, सेलूकाटे, प्रमोद दरणे, हिंगणघाट,महेंद्र टेकाडे तळेगाव, (शा.प.), संदीप सोनटक्के सिंधी रेल्वे, सुमित बनकर, कारंजा, विकेश नगराळे, शेगाव (कुंड), किशोर बर्डे देवळी,कार्तिक केळझरकर, सुनील सोनटक्केवाघोली, हरिदास महाजन, समुद्रपूरइत्यादी संमेलनाच्या चर्चेत सहभागीझाले होते. मार्गदर्शक म्हणून उद्योजकराहुल सुपारे यांनी निर्यातीबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. विद्यामानकर यांच्या मार्गदर्शनाखालीसदर सम्मेलनाचे आयोजन कृषी पर्यवेक्षक संजय डोंगरेयांनी केले. यावेळी पीएमएफएमइचे जिल्हाना ेडल अधिकारी तथा क ृषी उपसंचालक मंगेश ठाकरे आणि पोकरा योजनेचे प्रशांत साठे हेउपस्थित होते.