शिवसैनिकांच्या घरवापसीने भाजप-काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्याचा शिंदे गटासोबत घरोबा

वर्धा/प्रतिनिधी कधीकाळी कट्टर शिवसैनिक असलेल्या माजी राज्यमंत्र्यांनी दीड वर्षापूर्वी काँग्रेसचा “हात’ धरला होता. तर माजी जिल्हा प्रमुखांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, या दोघांचेही नव्या पक्षात मन रमत नसल्याने त्यांच्यातील शिवसैनिक जागा झाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये त्यांनी प्रवेश केला. दोन्ही शिवसैनिकांच्या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यातील भाजप आणि काँग्रेसलाही धक्का बसला. वर्ध्यातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी शिवसेनेतील अंतर्गत कलहाला कंटाळून दीड वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
त्यावेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रदेश उपाध्यक्ष हे पद देण्याचे आश्वासन दिले होते. पण, आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आणि पक्षामध्ये सन्मानाची वागणूकमिळत नसल्याची खंत पत्रकारपरिषदेत बोलून दाखवत त्यांनीगेल्या आठवड्यात काँग्रेसचाराजीनामा दिला. त्यामुळे अशोक शिंदे आता कोणत्या पक्षात जातात,याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच आर्वी विधानसभा क्षेत्रातून विधानसभा निवडणूक लढलेलेआणि जिल्हा प्रमुखपद सांभाळणारेनीलेश देशमुख यांनीही शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या विधानसभानिवडणुकीपासून ते चांगलेचसक्रिय झाले होते.
भाजपच्याआमदारांसोबतच राहणारे देशमुख यांना भाजपात मोठे पद मिळणार? अशी चर्चा होती. परंतु त्यांच्यासह माजी राज्यमंत्री अशोक शिंदेयांनी मुंबई गाठत मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशकेला. त्यामुळे आता या दोन्हीनेत्यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्तझाली आहे.