ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांकरता निलंबित

मुंबई/प्रतिनिधी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने ही कारवाई केली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी वकिली आचारसंहितेचे उल्लंघन करुन, वकिली गणवेशात आंदोलनात भाग घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते आता दोन वर्षांसाठी कोणत्याही कोर्टात वकिली करु शकणार नाहीत, किंवा कुणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत. वकिलांसाठी एक आचारसंहिता असते, त्याचे उल्लंघन केल्याची तक्रार करण्यात आली आहे. वकिलीच्या वेशात सार्वजनिक ठिकाणी आंदोलन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावरुन सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातील पिंपरी चिंचवड याठिकाणच्या आंदोलनाबद्दलत्यांच्यावर कारवाई करण्याआल्याची माहिती आहे. दोनवर्षासाठी आता सदावर्ते कोणत्याहीकोर्टात वकिली करु शकणारनाहीत. कुणाचीही बाजू मांडूशकणार नाहीत. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या यानिर्णयाला ॲड. गुणरत्न सदावर्ते हे आव्हान देणार असल्याचीमाहिती आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या या आधीही अशी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीही सदावर्ते यांनी त्या निर्णयाला आव्हानदिले होते.