नागपुरातील जी-२० मध्ये तामसवाडा प्रकल्प

वर्धा/प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व जल ही जीवनच्या चमुच्या वतीने विदर्भ व महाराष्ट्रात राबवण्या येत असलेल्या जलसंवर्धन व भुजल पुनर्भरणाच्या विविध पॅटर्न, अमृत सरोवर पॅटर्न, तामसवाडा पॅटर्न, बुलढाणा पॅटर्न, वाशिम पॅटर्नवर प्रत्यक्ष रूपाने झालेल्या जलसंवर्धन व भुजल पुनर्भरणाच्या प्रभावी व यशस्वी कार्याची माहिती जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने यांनी जी-२० मध्ये आयोजित एका चर्चा सत्रात सादर केली. केंद्रीय भुजल बोर्डाचे अध्यक्ष डॉ. सुनील कुमार यांना या सर्व कामाची माहिती पूर्ती सिंचन संस्थेचे सचिव माध्यम कोटस्थाने यांनी दिली. नागपूर येथे जी-२० उत्सवाचे निमित्ताने २४ रोजी केंद्रीय भुजल बोर्ड भारत सरकारचे वतीने नागपूर येथील चिटणीस संकुलात जलभरणा, अमृत व भुजल साठवण संकल्पनेवर परिसंवाद घेण्यात आला. यावेळी परिसंवादात वर्धा येथील माधव कोटस्थाने यांच्या नेतृत्वात मिलींद भगत, सत्यजित जांभुलकर, विनेश काकडे, विजय मुन, सचिन मात्रे सहभागी झाले होते.

याप्रसंगी मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ व उत्तरप्रदेश येथील विविध प्रकल्पाची माहिती देण्यात आली. सहभागाबाबत केंद्रीय भुजल बोर्डाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. चर्चासत्रातीलमाहितीचे आधारे अहवाल पुस्तिका प्रकाशितकरण्यात येणार आहे, असे सुनील कुमार यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पॅटर्ननुसार प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात विदर्भव राज्यात कामे करण्यात आली. यातबाळासाहेब ठेंग, व्ही. डी. पाटील, माधव कोटस्थाने, मिलींद भगत, राजेंद्र देशकर, विनेश काकडे, विजय घाटोले, सचिनकुळकर्णी, डॉ. नीलेश हेडा, सत्यजीतजांभुळकर व पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठ आदींचा सहभाग आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चारही पॅटर्ननुसार प्रत्यक्षात करण्यात आलेल्या कार्याच्यामाहिती पुस्तिका आयोजक केंद्रीय भुजल बोर्डाच्या अधिकार्यांना देण्यात आल्याची माहिती माधव कोटस्थाने यांनी दिली.