९ दिवसात ४० टक्के महिलांनी घेतला ५० टक्क्यांचा सन्मान

वर्धा/प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एस.टी.च्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार १७ रोजीपासून यावर अंमलबजावणी सुरू झाली. त्याअनुषंगाने ९ दिवसांत जल्ह्यातील पाचही आगारातून महिला सन्मान योजनेंतर्गत ४० टक्के महिलांनी ५० टक्के सवलतीचा म्हणजे तब्बल १ लाख ८० हजार २९८ महिलांनी योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात चांगली भर पडली. राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत तिकीट दरात सवलत देण्यातयेते. यापूर्वी स्वातंत्र्याच्याअमृत महोत्सवानिमित्त राज्यशासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलतजाहीर केली होती.

राज्याच्याअर्थसंकल्पामध्ये महिलांनाएसटीच्या सर्व प्रकारच्या बसतिकीट दरात ५० टक्के सवलतदेण्याची घोषणा करताच यायोजनेला वर्धा जिल्ह्यात भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेमुळे महिलांनाकामानिमित्त, नातेवाईकांकडे,पर्यटनासी, देवदर्शनासाठी जाणार्यामहिलांना मोठा फायदा होणारआहे. त्यामुळे शासनाच्या यनिर्णयाचे महिला वर्गांतून कौतुक केले जात आहे. वर्धा आगारातून ५१ हजार८४६ महिला, आर्वी आगारातून ४५ हजार ०३, हिंगणघाट ४८ हजार८२३, तळेगाव १५ हजार ०१०, पुलगाव १९ हजार ५८० असे ४ लाख ९३ हजार ५५७ प्रवाश्यांप१ लाख ८० हजार २९८ महिला प्रवाशांनी अर्ध्या तिकीटात प्रवास केला.

एसटी महामंडळाच्या वधआर्वी, हिंगणघाट, तळेगाव,पुलगाव या पाचही आगारातून४ लाख ९३ हजार ५५७ जणांनी प्रवास केला. यापैकी तब्बल १ लाख ८० हजार २९८ महिलांनी सन्मान योजनेचा लाभ घेऊन सवलतीत प्रवास केला. याची टक्केवारी ४० टक्के आहे. महिला सन्मान योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागल्याचे चित्र सध्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार वर्धा जिल्ह्यातील पाचही आगारांतून महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना ५० टक्के सवलतीत प्रवास करण्याचा लाभ दिला जातो आहे. मार्चअखेर १ लाख ८० हजार २९८ महिलांनी सवलतीत विविध ठिकाणी प्रवास केला आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन ४० टक्के महिलांनी प्रवास केल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी विजय धायडे यांनी दिली.