वर्धा स्फोटाच्या उंबरठ्यावर

वर्धा/प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपूर्वी रामनगर परिसरात हॉटेलमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. सुदैवाने त्यात दुर्दैवी घटना घडली नाही. परंतु, ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातील अनेक हॉटेल, मंगल कार्यालयातील स्वयंपाक, चहा टपरी, वेल्डींग दुकानांमध्यरे घरघुती सिलेंडरचा वापर केला जात आहे. आज अक्षरश: रस्त्यावर थर्मा प्लॉस्टिकचे काम करणार्या वाहनातही घरघुती वापराचे सिलेंडर दिसून आले. त्यामुळे तापत्या उन्हाळयात वर्धा स्फोटाच्या उंबरठ्यावर म्हटल्यास चुकीचे होणार नाही. केंद्र सरकारने घरघुती वापराचे सिलेंडर व्यावसायिक कामासाठी वापरण्यावर बंदी घातली आहे. दोन्ही सिलेंडरच्या भावात तफावत असल्याने जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा लोभात जिल्ह्यातील ग्रामीण भागात व्यावसायिक कामासाठीही घरघुती गॅस सिलेंडरचा वापर होतानाचे दिसुन येत आहे.

वर्धा शहरात रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आज २७ रोजी केसरीमल कन्या शाळेपुढून केळकरवाडीकडे जाणार्या रस्त्यावर दर्शक म्हणून लावण्यात येणारे पांढरे पट्टे (थर्मा प्लास्टिक) लावण्याचे काम सकाळी ११ वाजतापासुन सुरू झाले. रस्त्यावर जे पट्टे लावण्यात येतात त्यासाठी उकळता द्रव टाकल्या जातो. ते पट्टे लावण्याचे काम यवतमाळ येथील जे. एस. रोड सिस्टम या कंपनीकडे देण्यात आले आहे. त्या कंपनीच्या वतीने एम. एच. २७ एक्स ०३२५ क्रमांकाच्या मालवाहूमध्ये असलेल्या बंबातील द्रव उकळण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर करण्यात आला. त्या बंबाला लागून असलेले सिलेंडर व्यावसायिक असले तरी त्याच्या बाजूला घरघुती वापराचे दोन सिलेंडर ठेवलेले होते. शहरात अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये दाखवायला पुढे व्यावसायिक आणि बाजूला घरघुती वापराचे सिलेंडर दिसुन येतात.

या संदर्भात अधिक चौकशी केली असता पट्टे मारण्याचा कंत्राट यवतमाळ येथील सलीम नामक ठेकेदाराला देण्यात आला असल्याचे त्या कामावर असलेला कर्मचारी राहुल टिपले याने सांगितले. तसेच हे सिलेेंडर आमचा स्वयंपाकासाठी असल्याची माहितीही त्याने दिली. सेलू येथे कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून असलेल्या दुकानांच्या ओळीतील विदर्भ इंजिनिअरिंर्ग वर्क्स येथे भर उन्हात एका महाकाय मशिनचे वेल्डींगकरिता घरघ ुती ग ॅस सिलेंडरचा वापर करण्यात आला. आर्वी रस्त्यावर असलेल्या आकरे सभागृहाच्या खालच्या बाजूलालग्नासाठी करण्यात येत असलेल्यास्वयंपाकाकरिताही घरघुती वापराचेसिलेंडर वापरण्यात येते. शहरातीलहॉटेल रामाकृष्ण पुढे असलेल्या गॅस वेल्डींगच्या दुकानात तसेच न्यूआर्ट कॉमर्स कॉलेजमध्ये असलेल्यकॅटीनमध्ये घरघुती वापराचे सिलेंडरलावलेले असते.

विशेष म्हणजेया ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाविद्यालयातीलविद्यार्थी बसुन असताता. शहरातीलअनेक हॉटेल, फुटपाथवर खाण्याचेसाहित्य विकरणार्यांच्या गाडीवरघरघुती वापराचे सिलेेंडर दिसूनयेते. २ लाख ४४ हजार १२४आणि ४८ हजार ८३५ उज्ज्वला योजनेतील असे एकूण २ लाख ९२हजार ९५९ घरघुती वापराचे सिलेंडरअसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी दिली. व्यावसायिक सिलेंडरी माहितीउपलब्ध नसल्याचे ते म्हणाले.