जी-२० प्रतिनिधींचे नागपूर येथे मोठ्या उत्साहात स्वागत

नागपूर/प्रतिनिधी जी-२० परिषदेअंतर्गत येथे उद्यापासून आयोजित होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी देश-विदेशातून इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी सौम्या शर्मा यांनीप्रतिनिधींचे स्वागत केले. स्वागतासाठी विमानतळाचा आलेल्या प्रतिनिधींचे येथील डॉ. सारा परिसर सजला होता. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

सी-२० च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी यांच्यासह सदस्य देशांमधील नागरी संस्थांचे प्रतिनिधी या आगळ्यावेगळ्या स्वागताने भारावले होते. विमानतळाच्या लाऊंजमध्ये या प्रतिनिधींनी प्रवेश करताच नऊवारी परिधान केलेल्या मुली आणि धोतर ,कुर्ता व फेटा परिधान केलेल्या मुलांनी औक्षण करुन तसेच फेटा व सुताची माळ घालून पाहुण्यांचे स्वागत केले. सी-२० च्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी, जी-२० देशांच्या नागरी संस्थांच्या प्रतिनिधींचा यात समावेश आहे.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन केळीचे खांब, मोठे पितळीकळस आणि जोडीला कलावंतांनीआळवलेले बासरी, तबला आणि संवादिनीचे सूर, ठिकाणी – ठिकाणीउभारण्यात आलेले स्वागत फलकजी-२० व सी-२० चे आकर्षक बोधचिन्ह, सुमधुर संगीत आदींमुळेविमानतळावरील वातावरणउत्साहाने भारून गेल्याचे चित्रदिसून आले. लाऊंजमधून बाहेर पडतात ढोलताशांच्या निनादानेउत्साही वातावरणात अधिकच भपडली. नागपूरचे वैशिष्ट्य असलेल्यासंत्र्यासह संत्रा बफर्ीचा आस्वादही पाहुण्यांनी यावेळी घेतला. विमानतळाच्या परिसरातजी-२० देशांचे ध्वज डौलानेफडकत आहेत आणि हे प्रतिनिधीआपल्या देशाचा ध्वज बघून त्यालाभारतीय पद्धतीने प्रणाम करत होते.