मोदींनी जपानच्या पंतप्रधानांना दिली खास भेट

नवी दिल्ली/प्रतिनिधी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी थ े द्विपक्षीय चचार् केली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान किशिदा यांना कर्नाटकातील चंदनापासून बनवलेली बुद्ध मूर्ती कदमवुडच्या जाळीच्यापेटीत भेट दिली. चंदनाची कोरीव काम ही एक उत्कृष्ट आणि प्राचीन कलाकुसर आहे. कर्नाटकात शतकानुशतके प्रचलित आहे आणि वाढत आहे. या हस्तकलेत, सुगंधित चंदनाच्या ठोकळ्यांमध्ये गररिप गुंतागुंतीच्या डिझाईन्स कोरल्या जातात. किचकट नक्षीकाम, शिल्पे आणि इतर सजावटीच्या वस्तू यातून तयार केल्या जातात.