समाजामध्ये नागरिक शक्ती प्रबळ होणे आवश्यक- डॉ. अभय बंग

वर्धा/प्रतिनिधी समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत आणि यावर उपाय काय, तोडगा काय आहे. हासुद्धा एक मोठा प्रश्न आहे. सर्व सामाजिक प्रश्न केवळ सरकार सोडवेल ही अपेक्षा चुकीची असून समाजातील सर्व स्तरातून एकत्रित चळवळीची, प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्याकरिता समाजामध्ये नागरिक शक्ती प्रबळ होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले. ते ज्येष्ठ पर्यावरणवादी डॉ. गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारोहामध्ये बोलत होते.

डॉ.वेदप्रकाश मिर्शा म्हणाले, सहजता, सरलता व सुलभता व्यक्तीची ही आभूषणे आहेत. ज्या व्यक्ती सहज,सरल व सुलभ असतात त्याच व्यक्ती समाज घडवू शकतात. व्यक्तींर्नी दुसर्याकरिता आदर्श बनण्यासोबतच अनुकरणीय बनने आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात शंकरप्रसाद अग्निहोत्री म्हणाले की, सत्याचे अनुष्ठान, यशोगान, संप्रेषण करावे. ज्यामुळे आपले विचार, विवेक, सदसदविवेकबुद्धी,मन व चित्त शुद्धी होऊन समाजाभिमूख व्यक्तिमत्त्व तयार होतील.

सामाजिक विकास होईल. सत्याचे अधिष्ठान, अनुष्ठान, संप्रेषण, आविष्कार केल्याने समाजोपयोगी विचारधारा निर्माण होऊन त्यातून कल्पना, कल्पकता, सृजनशीलता, संवेदनशीलता यांची निर्मिती होऊन अनुकरणीय व्यक्तिमत्त्व घडतील व त्यामुळे सामाजिक विकास होईल. त्यामुळे सत्याचे अधिष्ठान, अनुष्ठान, संप्रेषण, आविष्कार व यशोगान करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. गिरीश गांधी सत्काराला उत्तर देताना म्हणाले, मी गांधी विनोबांच्या विचाराने प्रेरित असून तेच माझे आदर्श व र्शद्धा स्थान आहेत.

आपण आपले जीवन स्वाभिमानाने जगले पाहिजे पुढील व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्याच्या समोर लाचार होऊ नये. समाजासाठी जे कोणी चांगलं काम करीत असेल मग तो कोणत्याही पक्षाचा, जाती धमार्चा असो त्याला मदत केली पाहिजे तरच समाजाचा विकास होईल. यथा राजा तथा प्रजा हे दिवस आता संपले आहेत. आता यथा प्रजा तथा राजा अशी परिस्थिती निर्माण होणे आवश्यक असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात डॉ. गिरीश गांधी यांचा शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्रदेऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यास्नेहभेट म्हणून रोख रकमेची थैली प्रदान केली असता त्यांनी ती रक्कम सेवाग्राम टव इतर सेवाभावी संस्थेला अर्पण करणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नारायणनिकम यांनी केले. यावेळी वि.स जोग यांनीआपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शुभदा फडणवीस, डॉ. चंद्रकांत कोठारे यांनी केले तर सन्मानपत्राचे वाचन प्रा. अभिषेक सिंह यांनी केले. आभार संदीपचिचाटे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन जय महाकाली शिक्षण संस्था, तथा वर्धा जिल्ह्यातविविध सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिसंघटनांनी संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी विविध संघटनांनी डॉ. गिरीश गांधीयांचे पुष्पगुच्छ शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी अनिल नरेडी, श्रीराम शर्मा, संदीप चिचाटे, प्रकाश खंदार, प्राचार्य डॉ. गजानन जंगमवार, डॉ. धर्मेंद्र मुंदडा, डॉ. दीपक पुनसे, डॉ.नरसिंग यादव आदींनी सहकार्य केले.