पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी यांची नवी दिल्ली येथे खासदार रामदास तडस यांनी घेतली भेट

वर्धा/दिल्ली/प्रतिनिधी आज नवी दिल्ली येथे भारताचे लोकप्रीय व यशस्वी प्रधानमंत्री मा. श्री. नरेन्द्रजी मोदी यांच्या समवेत वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी भेट घेऊन वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर सकारात्मक चर्चा केली व त्यांचे मार्गदर्शन घेतले. आज भारताचे लोकप्रीय व यशस्वीप्रधानमंत्री मा. श्री. नरेन्द्रजी मोदी यांचीसंसद भवन येथे पंतप्रधान कार्यालयात भेटघेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यांची भेट जोमाने जनतेचे कार्य करण्यासाठी नेहमीचएक नवीन ऊर्जा निर्माण करणारी ठरते. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांनी त्यांचा अमूल्य वेळ उपलब्ध करून दिल्याबद्दल व मार्गदर्शनाबद्दल खासदार रामदासजी तडस यांनी पंतप्रधान महोदयांचआभार मानले.