संपाचे तीव्र पडसाद! रुग्णांचे हाल, सरकारी विभागांचे कामकाज ठप्प

 मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचारीकाम सोडून आज मंगळवारी संपावर गेले.सर्व कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत.आपल्या मागण्यांसाठी सर्व कर्मचारीसंपावर आहेत. सफाई कामगारांपासून ते शिक्षक संपात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर रुग्णालयातील कर्मचारीआणि इतर शासकीय कर्मचारीही संपावरबसले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सध्या दहावी आणि बारावीचे पेपर सुरू असतानाच लाखो सरकारी कर्मचारीसंपावर गेले आहेत. संपावर असलेले सरकारी कर्मचारी “एकच मिशन, बहाल करा जुनी पेन्शन’ अशा घोषणा देत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी देशभरात आवाज उठवला जात आहे.

तथापि, अनेक गैर-भाजप शासितराज्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनीपेन्शन योजना पुनर्संचयित करण्याचा निर्णयघेतला आहे. याबाबत महाराष्ट्रातीलसरकारी कर्मचारीही जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची मागणी करत आहेत. ओपीएस २००३ मध्ये एनडीए सरकारने १ एप्रिल २००४ पासून बंद केले होते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवडक गटालापुन्हा एकदा जुन्या पेन्शन योजनेचा पर्यायनिवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार,एक मोठे पाऊल म्हणून, योजनानिवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.या पर्यायांतर्गत, जे कर्मचारी २२ डिसेंबर२००३ पूर्वी, ज्या दिवशी नॅशनल पेन्शनसिस्टीम अधिसूचित केले गेले. त्या दिवशीजाहिरात केलेल्या किंवा अधिसूचितकेलेल्या पदांविरुद्ध केंद्र सरकारच्यासेवांमध्ये रुजू झालेले कर्मचारी केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, १९७२साठी पात्र असतील. आता २०२१)जुन्या पेन्शन योजनेत सामील होण्यास पात्र आहेत.

या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

या संदर्भात विविध निवेदने/संदर्भ आणि न्यायालयांच्या निकालांच्या प्रकाशात, वित्तीय सेवा विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, खर्च विभाग आणि कायदेशीर व्यवहार विभाग यांच्याशी सल्लामसलत करून प्रकरण तपासले गेले आहे. आदेशात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या नागरी सेवकाची नियुक्ती एखाद्या पदावर किंवा रिक्त पदांवर केली गेली आहे. ज्यात भरती/ नियुक्तीसाठी जाहिरात / अधिसूचित करण्यात आले होते, जे लोक राष्ट्रीय पदासाठी अधिसूचनेच्या तारखेपूर्वी सेवेत रुजू होतात. निवृत्तीवेतन प्रणाली म्हणजे २२ डिसेंबर २००३ आणि १ जानेवारी २००४ किंवा त्यानंतर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत समाविष्ट आहेत.

वाशिम जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा

राज्य शासनाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आज वाशिम जिल्ह्यातील शासकीय निमशासकीयकर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. आरोग्य विभागानेही या संपात सहभाग घेतल्याने आरोग्य यंत्रणा विस्कळित झाली आहे. संप पुकारलेल्या कर्मचाऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर

सरकार विरोधात घोषणाबाजी जुन्या पेन्शनसाठी सर्व कर्मचारी एकजुटीने संपामध्ये सामील झाले आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजारोच्या संख्येने कर्मचारी निदर्शन करत आहेत. सरकार जोपर्यंत जुनी पेन्शन लागू करणार नाही तोपर्यंत असाच संप सुरू राहणार असल्याचा सरकारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यामुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात १५००० कर्मचारी संपावर

जुनी पेन्शनसाठी रत्नागिरी जिल्ह्यात देखील मा ेठ्या प्रमाणात कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. परिणामी जिल्ह्यातल्या सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सध्या मनुष्यबळाची कमी जाणवत आहे. जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयासमोर कर्मचारी एकत्र गोळा झाले असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर माघार नाही अशी भावना हे कर्मचारी बोलून दाखवत आहेत. जिल्ह्यात १५००० कर्मचारी संपात सहभागी झाले असून आपत्कालीन परिस्थितीसाठी पोलीस आणि होमगार्ड यांची देखील मदत घेतली जाणार आहे.

बुलढाण्यातील २८५०० राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

बुलढाणा जिल्ह्यातील २८५०० राज्य सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदतसंपावर आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलशिक्षण, आरोग्य व्यवस्था कोलमडण्याचीशक्यता आहे.

यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना संपाचा फटका

यवतमाळमध्ये जुन्या पेन्शनसाठीशिक्षक संघटना आक्रमक झाल्याआहेत. आजपासून शिक्षक व शिक्षकेतरकर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने शासकीय व खाजगी, अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. तर काही शाळेतील शाळा शिक्षकांविना सुरू आहे.

राहुरी कृषी विद्यापीठात आंदोलन

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आज सुरू झालेल्या बेमुदत संपात राहुरी कृषी विद्यापीठातील कर्मचारीही सहभागी झाले आहेत. एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांसह कृषी विद्यापीठातील कर्मचारीही बेमुदत संपावर गेल्याने विद्यापिठातील कामकाज ठप्प झालं आहे.

बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी राज्यभरातील प्रशासकीय सरकारी कर्मचारी हे संपावर गेले आहे. यामध्ये बीडच्या पोलीस अधीक्षककार्यालयातील प्रशासकीय कर्मचारी देखील या संपामध्ये सहभागी झालेआहेत. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ही लोकं काम करत असतात मात्र जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पोलीसअधीक्षक कार्यालयातील या कर्मचाऱ्यांनीदेखील संप पुकारला आहे.. त्यामुळे या कार्यालयात चालणाऱ्या प्रशासकीय कामबंद झालं आहे.

कोकण भवन मध्ये जुनी पेन्शन लागू करण्यासाठी काम बंद

आंदोलन नवी मुंबई कोकण भवन कर्मचार्यांनीजुनी पेन्शन मागणी संदर्भात व इतरमागण्या संदर्भात राज्य शासकीयकर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेलाआहे. याबाबत राज्य शासनाला पूर्वकल्पना असूनही काल सुकानू समितीच्याझालेल्या बैठकीमध्ये यावर कोणताही तोडगा न निघाल्याने आज पासून राज्यातले जवळपास १७ लाख हुन अधिक कर्मचारी संपामध्ये उतरले असून हा संप शंभर टक्केयशस्वी झालेला आहे . त्याचबरोबर या संपाला अधिकारी महासंघाचा देखील पाठिंबा असून अधिकारी महासंघ देखीलजर हा संप असाच कायम राहिला तर दिनांक २८ मार्चपासून सर्व अधिकारी वर्ग महासंघ या संपामध्ये सामील होणारआहेत.

ज्यांना शिक्षणाची अट नाही त्यांना का पेन्शन?

आरोग्य संघटनेचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीजिल्ह्यातील कर्मचारी बेमुदत संपावरगेले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकाढण्यात आला. ज्यांना शिक्षणाची अट नाही अशा लोकप्रतिनिधींना पेन्शन देण्यात येते, आम्ही तर शासकीय सेवेत ३० ते ३५ वर्षे काम करतो तरीपण पेन्शन का नाही तो तर आमचा हक्क आहे. आमचा हक्काचा पैसा शासन म्युचल फंड, शेअर्स मार्केटमध्ये टाकते आणि अदानी सारखे लोक ते घेऊन पळतात असं या संघटनेनं म्हटलं आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आमची महाराष्ट्र सरकारी कर्मचारी महासंघ स्थापन केली आणि म्हणूनच आम्ही भगवी टोपी घालून हे आंदोलन करीत आहोत असं या आंदोलकांनी म्हटलं आहे.

जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा: ॲड. प्रकाश आंबेडकर

जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यभर सरकारी कर्मचारी आंदोलन करत असताना त्याला वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये पेन्शन स्कीम बंद करण्यात आली. बंद करते वेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की वीस वर्षानंतर याचे परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात होतील. आज ते परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्याने जुनी पेन्शन स्कीम सुरू करावी म्हणून आंदोलनाला सुरुवात केली आहे. कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे. पेन्शन चालू झाली पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे. काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला यामुळे काँग्रेस पक्षाचेही आम्ही अभिनंदन करतो. पेन्शन स्कीम लागू झाली पाहिजे यासाठी आपण लढताय त्याबद्दल पक्षाच्या वतीने शुभेच्छा!