दुचाकीने घेतला पेट अन् राहिला फक्त “सांगाडा’, पाहण्यासाठी नागरिकांची उसळली गर्दी

वर्धा/प्रतिनिधी दुचाकी दुरुस्त करीत असतानाच अचानक पेट्रोलचा भडका उडून दुचाकीने पेट घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. ८.३० वाजताच्या सुमारास बॅचलर पाहता पाहता दुचाकी जळून कोळसा होत फक्त सांगाडाच उरला. ही घटना ११ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बॅचलर रोडवर असलेल्या काँग्रेस कमिटीच्या सद्भावना भवनच्या लगत घडली. या घटनेमुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांची चांगलीच गर्दी उसळली होती. मंजू जालन रा. बोरगाव (मेघे) यांची दुचाकी अचानक खराब झाल्याने ती दुचाकी घेऊन त्या रात्री रोडवरील सद्भावना भवनाच्या खाली असलेल्या सुरेश गाडी रिपेअरिंर्ग सेंटरमध्ये घेऊन गेल्या. दुचाकी दुरुस्ती करीत असताना पेट्रोल लीक होत होते. दरम्यान अचानक करंट चेक करीत असताना दुचाकीने पेट घेतला आणि काही लक्षात येण्यापूर्वीच दुचाकीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. जवळपास एक तास ही आग सुरू होती. त्यानंतर दुचाकीचा फक्त सांगाडाच उरला होता.