केन्द्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील महिलापंर्यत पोहोचवण्याचे कार्य महिलांनी करावे- प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ

देवळी/प्रतिनिधी आज आपण जागतिक महिला दिन साजरा करीत आहे, पंरतु आपल्या महिला खरच सक्षम झाल्या आहे का, प्रत्येक महिलांमध्ये एक क्वालीटी असते क्वालीटीचा उपयोग समाजातील इतर महिला होईल यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे. आपला समाज झपाट्याने बदलत आहे, देशाच्या विकासाचा प्रवास गतिमान करायचा असेल, तर मुलगा-मुलगी हा भेद नष्ट करून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण एका मोठ्या वर्गाकडे दुर्लक्ष करून कोणतेही राष्ट्र प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. महिलांनी विकासात सहभागी होण्यासाठी त्यांना लहानपनापासून मुले-मुली समान आहे ही शिकवन देणे आवश्यक आहे. केन्द्र सरकारने महिला सक्षमीकरणाकरिता अनेक चांगले निर्णय घेतले आहे, तसेच शिंदे-फडणवीस सरकारने महिला सक्षमीकरण करणारा २०२३-२४ चा महाअर्थसंकल्प सादर केलेला आहे, यामध्ये महिलाच्या हितासाठी कल्याणकारी निर्णय घेतले आहे, त्यामुळे मुलीने जन्म घेतल्यापासून ते प्रवास करण्यापर्यत, नोकरदार महिलांसाठी निर्णय घेतले, महिलाचा हिताचा बजेट आजपंर्यत या महाराष्ट्रात सादर झालेला नाही.
त्यामुळे या योजनेचा लाभ इतर महिलांना कसा होईल यासाठी पुढाकार घेऊन केन्द्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील महिलापंर्यत पोहोचवण्याचे कार्य महिलांनी करावे असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. त्या देवळी येथे जागतिक महिला दिन निमीत्य भव्य महिला मेळावा व सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलत होत्या. श्री. चंद्रकौशल्य हॉल देवळी येथे जागतिक महिला दिन निमीत्य भव्य महिला मेळावा व सत्कार सोहळा कार्यक्रम भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, यावेळी अध्यक्षस्थानी भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ.वैशाली येरावार, प्रमुख पाहुने म्हणून माजी अध्यक्ष जि.प.वर्धा सौ. सारीका गाखरे, माजी नगराध्यक्ष सौ. शोभा तडस, माजी नगराध्यक्ष सौ. शितल गाठे, माजी नगराध्यक्ष श्रीमती सुचिता मडावी, ॲड सुरकार, व सर्व जि.प. माजी सभापती, प.स.माजी सभापती उपस्थित होते.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वर्गीय सुषमा स्वराज्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्धा जिल्हयातील १७ महिलांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच नवनिर्वाचीत महिला सरंपच यांच्या सुध्दा गौरव यावेळी करण्यात आला. भव्य महिला मेळावा व सत्कार सोहळा कार्यक्रमास आलेल्या महिलांमधुन लकी ड्रा कुपन व्दारे ५ लकी महिलांना पैठणी व ५ लकी महिलांना ठुसी देवुन गौरवण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ.वैशाली येरावार, प्रमुख पाहुने म्हणून माजी अध्यक्ष जि.प.वर्धा सौ. सारीका गाखरे समोयोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सौ. शोभा रामदास तडस यांनी केले व आपल्या प्रास्तावीक कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली.
पाहुण्याचा परिचय सौ नंदाताई वैद्य यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन सौ. वनिता मदणकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सारिका लाकडे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सौ. शुभांगी कुर्जेकर, सुनिता बकाने, सुनिता ताडाम, संगिता तराळे, कल्पना ढोक, सारिका कारोटकर, माधुरी देवके, मिनाक्षी कामडी, विजयश्री पारसडे, सौ. मेघना तपासे, अहिल्या डाहाके, माया वडेकर, माधुरी तडस, ज्योती खाडे, संगिता सावळे, वैशाली समर्थ यांनी प्रयत्न केले, कार्यक्रमाला मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.