शिंदे गटाच्या शिवसेनेने केला तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव

वर्धा/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिंदेगट शिवसेनेच्या वतीने तिथीनुसार १० रोजी शहरात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेश सराफ यांच्या मार्गदर्शनात सकाळी ९ वाजता जिल्हा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. पोहाड्यांच्या गजरात मोटार सायकल रॅली काढण्यात आली. आर्वी नाका चौक, बॅचलर रोड, शास्त्री चौक, रेल्वे स्टेशन, बजाज चौक मुख्य रस्ता मार्गे जय शिवाजी, जय भावनी, जय श्री रामचा जयघोष करीत ठाकरे मार्केट येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पोहोचली. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या मूर्तीला फुलांनी सजवलेल्या पालखीतून सायंकाळी ७ वाजता कारला पुतळा चौकाकडे जाण्यासाठी चौकातून डीजे, ढोल ताशा व शोभायात्रेला सुरुवात झाली.
प्रमुख मार्गाने फटाक्याच्या आतषबाजीत मिरवणूक कढण्यात आली. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, बाल शिवाजीच्या वैशातील सजवलेल्या घोड्यावरील सहभाग होता. यावेळेस सहसंपर्क प्रमुख राजेश सराफ, जिल्हा प्रमुख गणेश इखार, संदीप इंगळे, निखिल सातपुते, किशोर बोकडे, दिलीप भुजाडे, विवेक ठाकरे, विजय हाडगे, शुभांगी ठमेकर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. शोभयात्रेत राकेश खोंडे, नंदू सरोदे, निलेश वैद्य, महेश चौधरी, वैभव शेंडे, राजश्री राऊत, आदित्य गारसे, अनिकेत जगताप, सुरज गुळघाने, मारोती जगताप, प्रेमदास मोखाडे, विशाल भोंग, गोपाळ मात्रे, सोहेल खान, निसार खान, तेजराम लिचडे, शुभांगी ठमेकर, माया गारसे, वंदना बोकडे, कीर्ती सोमवंशी, संध्या अतकर आदीेसह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी अन्नदान करण्यात आले.