सावंगी मेघे रुग्णालयात जागतिक श्रवणदिन साजरा

वर्धा/प्रतिनिधी वयपरत्वे किंवा अन्य कारणांमुळे कर्णबधिरता निर्माण होऊ शकते. कोणत्याही कारणामुळे आपल्याला कमी ऐकू येत असल्यास श्रवणयंत्र लावण्याबाबत जराही संकोच करू नका. ते स्वतः च्या, परिवारातील सदस्यांच्या आणि समाजाच्या हिताचे असून अनेक अनर्थ त्यामुळे टळतात, असे प्रतिपादन उपअधिष्ठाता डॉ. सतीश महाजन यांनी सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठातील कान, नाक व घसा विभागाद्वारे जागतिक श्रवण दिनानिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमात केले. सावंगी मेघे रुग्णालयात श्रवण दिनानिमित्त दोन वर्षांखालील बालकांच्या कानांची तपासणी, कानांची स्वच्छता व निगा राखण्याबाबत मार्गदर्शन, श्रवणयंत्रणा तपासणी, इलेक्ट्रो फिजिओलॉजीच्या विद्यार्थ्यांचे बेरा तंत्रप्रशिक्षण तसेच ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन, अशा विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
रुग्णालयाच्या प्रतिक्षालय दालनात आयोजित जनजागर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. महाजन लाभले होते. यावेळी कान, नाक व घसारोग विभाग प्रमुख डॉ. प्रसाद देशमुख यांनी कर्णबधिरता येऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, अद्यावत उपचार, रुग्णाचे पुनर्वसन, मनोसामाजिक विकास आदीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. विशेषज्ञ डॉ. श्रद्धा जैन यांनी जन्मतः येणाऱ्या कर्णबधिरतेचि कारणे, उपाययोजना तसेच बालकांच्याभाषाविकासासाठी कॉक्लिअरइम्प्लान्ट उपचाराची उपयुक्ततायाबाबत माहिती दिली. रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अभ्युदय मेघे,मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रशेखर महाकाळकर यांच्यमार्गदर्शनाखाली आयोजितया उपक्रमात कान, नाक वघसा विभागातील डॉ. सागरगौळकर, डॉ. चंद्रवीर सिंग,ऑडिओलॉजिस्ट डॉ. आशीषदिसवाल, डॉ. अभिषेक जोशी, डॉ. अजिंक्य संदभोर, डॉ. सेनू सन्नीचन, डॉ. ऐश्वर्या विजयप्पन, डॉ. वैदेही हांडे, डॉ. मनीषा दास, डॉ. मिथुला मुरली, डॉ. निमिषा पाटील, डॉ. स्मृती वाधवा, डॉ. आयुषी घोष, डॉ. जसलीन कौर, डॉ. अभिजित, डॉ. हर्षिल, डॉ. जया गुप्ता, डॉ. वैभवी, डॉ.परिंर्दिता, प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, प्रतीक गडकरी,वाचा उपचार तज्ज्ञ किरण कांबळे,ऑडिओलॉजिस्ट प्रियता नाईक, संजय कराळे, गायकवाड, वैशालीपेटकर, वैद्यकीय सामाजिककार्यकर्ते राकेश अगडे, स्नेहा,राजेश गडरिया तसेच विद्यार्थ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.