कलावंतांनी, कवींनी सत्याची बाजू घ्यावी- किशोर बळी

वर्धा/प्रतिनिधी लोकशाहीचे सर्व स्तंभ खिळखिळे होत असताना केली, घालते नवऱ्यासाठी फेऱ्या वडाच्या झाडाले, आता कसं सांगू तुले गं सावित्रीबाई फुले’ अशी या कार्यक्रमाची सुरुवात करीत त्यांनी अनेक कविता आणि गज़ल सादर करून उपस्थितांची भरभरून दाद मिळविली. ‘अंगावरती कापड दे अन् डोक्यावरती छप्पर दे, जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे’ अशी वैश्विक मागणी करीत ‘मैफल आहे दोन घडीची नंतर निघून जाणे आहे’ या शब्दात त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला.
प्रारंभी कल्पना सातव, स्मिता नागराळे आणि सहकाऱ्यांनी अंधश्रद्धा निमर्ूलनावर नाटिका तसेच चळवळीची गाणी सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकनिलेश गुल्हाने यांनी केले. संचालन डॉ. किरण शेंद्रे वंजारे यांनी केले, तर आभार डॉ. सुचिता ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरजगणवीर, शुभम जळगावकर, भूषण मसणे, संजय जवादे, धीरज चौधरी, अभिजित गौतम, निलेशबोबडे, श्रीपाल मारवाडे, निखिल शिंगारे, अथर्व भिंगारे, सुमित उगेमुगे, प्रा. किशोर वानखडे, सुनिल पाटणकर, मनीष जगताप, नाना आटे, ॲड. के. पी. लोहवे, डॉ. सीमा पुसदकर, पी. के. खोबे, किरण पट्टेवार, डॉ. विद्या राईकवार, जयंत सबाने, संदिप लटारे, अंकुश कत्रोजवार, डॉ. अभिविलास नखाते, सतीश जगताप, बालू येऊलकर, आशिष पडोळे, सुरेंद्र नगराळे, मनीष पुसाटे, सुधीर पांगुळ, महेंद्र खडसे, डॉ. चंदू पोपटकर, प्रा. प्रवीण ठाकरे, प्रा. एकनाथ मुरकुटे, प्रा. मोना जयस्वाल, सुरज बोदिले, पल्लवी बोदिले, गणेश शेंडे ,निलेश खेकरे, निलेश प्रजापती, शोण जयस्वाल, सान्वी वंजारे, मारुती चवरे, दिनेश नंदनवार तसेच जिल्हा वतालुका कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. या होलिकोत्सवाला ज्येष्ठ नागरिकांची, युवकयुवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बुद्धिप्रामाण्यवादी नागरिकांनी एक होत सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे.
राज्यकर्ते जर लोककल्याणकारी निर्णय घेत नसतील तर कलावंतांनी आणि कविलेखकांनी निर्भयपणे सरकारला जाब विचारला पाहिजे, असे प्रतिपादन सिनेदूरदर्शन कलावंत व साहित्यिक किशोर बळी यांनी सत्ताविसाव्या लोकजागर स्मशान होलिकोत्सवात आयोजित ‘हास्यबळी डॉट कॉम’ या कार्यक्रमात केले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निमर्ूलन समितीच्या जिल्हा व तालुका शाखेद्वारे स्थानिक स्मशानभूमीत होळीपौर्णिमेला आयोजित या लोकजागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी सचिन जगताप होते. यावेळी, अ.भा. अंनिसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, युवा शाखेचे राज्य संघटक पंकज वंजारे, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, उपाध्यक्ष डॉ. धनंजय सोनटक्के, दादाराव मून, प्रा. हाशम शेख, डॉ. सुभाष खंडारे, महिला शाखेच्या जिल्हा संघटक प्रा. डॉ. सुचिता ठाकरे, सचिव निलेश गुल्हाने, सहसचिव अजय इंगोले, सहसंघटक आकाश जयस्वाल, तालुका संघटक रवी पुनसे, सचिव आशिष मोडक यांची प्रमुख उपस्थिती होती.
मनोरंजन आणि प्रबोधनाचा समन्वय साधणाऱ्या या कार्यक्रमात किशोर बळी यांनी दैनंदिन जीवनातील अनेक गमतीदार प्रसंग सांगून रसिकांना खळखळून हसविले. तर, वर्तमानकालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर विनोदी शैलीत भाष्य करीत त्यांनी उपस्थितांना अंतमर्ुखही केले. अतिशयोक्ती, विसंगती आणि अपेक्षाभंग यातून विनोदनिर्मिती होत असून विनोदालाही दुःखाची, वेदनेची झालर असते, असे किशोर बळी म्हणाले. ‘बाई शिकली तरीही नाही अंधश्रद्धा गेली, केले उपासतापास पूजा दगडाची