रविवारी वर्धेत शब्बीर कुमार लाईव्ह

वर्धा/प्रतिनिधी जय महाकाली शिक्षण संस्था व सृजन म्युझिकल यांच्या संयुक्त वतीने रविवार १२ रोजी सायंकाळी ७ वाजता अग्निहोत्री महाविद्यालयातील शिवशंकर अग्रिहोत्री सभागृहात “शब्बीर कुमार लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या हिंदी चित्रपट गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी गुरुवार ९ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पं. अग्निहोत्री पुढे म्हणाले की, वधर् ेत सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी आपण गायणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शब्बीर कुमार यांनी नौशाद, चित्रगुप्त, शंकर जयकिशन, उषा खन्ना, लक्ष्मीकांत-प्यारेलाल कल्याणजी आनंदजी या नामवंतांसोबत काम केले तर मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मोहम्मद अजीज, महेंद्र कपूर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम, अनुराध पौडवाल, अलका पानीक इत्यादी महान गायकांसोबत अनेक सुप्रसिद्ध गाणी गायली आहेत. शब्बीर कुमार यांनी लता मंगेशकर यांच्या सोबत एकूण ४८ गाणे गायली. धावाधावीच्या जीवनातील थकव्यावर संगीत हा उपचार असल्याने या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पं. अग्निहोत्रीयांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजक शशीकांत बागडदे हे आहेत तर संगीत संयोजन चारू साळवे यांचे राहील. कार्यक्रमाच्या निर्मात्यास्वाती हितेश बमनोटे असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेलाशशिकांत बागडदे, अरुण वसु,गजानन दांदळे, डॉ. गजाननजंगमवार, डॉ. पुनसे, अभिजित रघुवंशी आदींची उपस्थिती होती.