चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा मोठा विजय

पुणे/प्रतिनिधी एकीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा मोठा फटका बसला असताना चिंचवडमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळालं आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपानं पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जोरदार चर्चा राजकीय वतर्ुळात पाहायला मिळाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे निवडणूक पार पडली. शिवाय, उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी झाल्यामुळे ही तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये अश्विनी जगताप यांचा ३६, ०९१ मतांनी मोठा विजय झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते.
अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी विजयानंत दिली आहे.लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पोटनिवडणुका लागल्या. यासाठी भाजपाकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाकडून मागणी करण्यात आली. राजकीय वतर्ुळात त्यासंदर्भात मोठी चर्चाही सुरू झाली होती. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडल्यानंतर कुणाला उमेदवारी द्यावी, याचा विचार सुरू झाला. बऱ्याच प्रतीक्षेनंतर नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.