जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवळी येथे सेवा निवृत्ती समारोप

देवळी/प्रतिनिधी स्थानिक जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवळी येथे प्राचार्या सौ वनिताताई मदनकर व उपमुख्याध्यापक श्री रमेश तेलरांधे यांचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लोक शिक्षण मंडळ देवळी चे अध्यक्ष मा. रविबाबूजी शेंडे होते, तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव मा. डॉ सुनिताताई शेंडे या होत्या. श्री सुहासजी किटे, सौ सुनंदाताई किटे, डॉ नरेंद्रजी मदनकर,सेवानिवृत्त प्राध्यापक श्री साटोणे सर, जनता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री महेंद्र झाडे, शाळेचे पर्यवेक्षक श्री धर्मेश झाडे, सौ. वनिता तेलरांधे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण, द्विप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री रविबाबू शेंडे व सचिव डॉ सुनीताताई शेंडे यांच्या हस्ते प्राचार्य सौ वनिताताई मदनकर व डॉ नरेंद्रजी मदनकर तसेच उपमुख्याध्यापक श्री रमेश तेलरांधे व सौ वनिता तेलरांधे यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या आजवर संस्थेला दिलेल्या सेवेचा सत्कार केला.
याप्रसंगी सौ. सुरेखा हिंगे, कु गीता बुंदेले, सौ प्रिया शिंदे, श्री डॉ मेहेरकिरण गुजर आदी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख उपस्थिती मध्ये असणारे डॉ श्री नरेंद्रजी मदनकर, सौ वनिता मदनकर, श्री साटोणे सर या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक श्री धर्मेश झाडे यांनी सौ वनिता मदनकर, व श्री तेलरांधे यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. सत्कारमूर्ती प्राचार्या सौ मदनकर व उपमुख्याध्यापक श्री तेलरांधे यांनी आपल्या संपूर्ण कार्याचा, सेवेचा अनुभव सर्वांसमोर व्यक्त केला संस्थेचे आभार म्हणाले. प्रमुख पाहुणे डॉ सुनिताताई शेंडे यांनी सेवानिवृत्त प्राचायार् व उपम ुख्याध्यापक यांच्या सेवेचा गुणगौरव केला आणि त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष श्री रविबाबूजी शेंडे यांनी प्राचार्या सौ मदनकर व उपमुख्याध्यापक श्री तेलरांधे यांच्या आजवरच्या कार्याचे कौतुक केले आणि सेवेबद्दल आभार मानले. कार्यक्रमचे संचालन कु रुपाली घोडे यांनी तर आभार प्रदर्शन कु मुक्ता नौकरकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक बंधू बघीनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.