नाचणगांव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न

नाचणगांव/प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवनाच्या माध्यमातुन समाज बांधवांनी केन्द्र शासनाच्या व राज्यशासनाच्या योजना चे प्रशिक्षण वर्ग आयोजीत करुन त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना पोहचेले यासाठी प्रयत्न करावे असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले. खासदार महात्म म्हणाले की, महाराष्ट्रात माझ्या प्रयत्नातुन ६१ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवनाची निर्मीती करण्यात आलेली आहे, या माध्यमातुन समाज बांधवानी भवनाचा उपयोग लोकहितार्थ करावे असे यावेळी म्हणाले.

नाचणगांव येथे २५/१५ व ग्रामीण विकास निधीए १२३८/२अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहाचा लोकार्पणसोहळा पदम्श्री माजी खासदविकास महात्मे यांच्या शुभहस्ते व खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळीमुख्य अतिथी म्हणून आमदाररामदास आंबटकर, आमदारदादाराव केचे, राजेश बकाने,दिपक फुलकरी, सौ. विद्या भुजाडगजेन्द्रजी कापडे, प्रशांत हुलके, प्रभाकर ढोक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन संदिपपुनसे यांनी केले तर उपस्थिताचे आभार प्रभाकर ढोक यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉ.रायपुरे, रामदास साव, वसंतराव साव, नितीन होटे यांनी सहकार्य केले, कार्यक्रमाला मोठया संख्येने समाजबांधव व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.