ते आमदाराचे आश्वासन फोल ठरले; महाविकास आघाडी सेलु यांचा आरोप

सेलू/प्रतिनिधी महावितरण कंपणीकडुन शेतकऱ्यांना १२ तास दिवसाला वीज पंपाला वीज मिळवुन देतो. त्यासाठी नागपुर हिवाळी अधिवेशनात आवाज उठवुन विजपंपाला दिवसाला १२ तास विज मिळवुन देतो असे आवश्वासन आमदार डॉ. पंकज भोयर व आर्वी धानसभेचे आमदार दादाराव केचे यांनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिले होते. परंतु त्यांचे ते आश्वासन फोल ठरल्याचा आरोप राष्ट्रीय ग्रेस पक्षाचे सेलु तालुक्याचे नेते पुभाऊ जयस्वाल व राष्ट्रवादी काँग्रेस किसानसभेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव कोकाटे यांनी सेलु येथील महाविकास आघाडीच्या तहसिल समोरील धरणे मंडपात केला.

सेलु तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आंदोलन करण्यात आले. त्यात कापसाला प्रति किंटल रुपये १२,०००/- भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या वीज पंपाला १२ तास दिवसाला वीज पुरवठा मिळावा, शेतकऱ्यांच्या पंपाच्या वीज जोडण्या कापण्यात येऊ नये व कापलेल्या वीज जोडण्या जोडून द्याव्या असे आदेश महावितरण कंपनीला करावे, महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत ५०,०००/- रुपयाचे अनुदान अतिवृष्टी ग्रस्त या वर्षीच्या शेतकऱ्यांना देण्यात यावे, सरसकट विजेची दरवाढ होत असून ती तत्काळ थांबवावी, पीक विम्याची रक्कम तातडीने व झालेल्या नुकसानी प्रमाणे देण्यात यावी.

सेलू तहसिलदार सुर्यवंशी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुल मंत्री व कृषीमंत्र्यांना निवेदन पाठविणार असल्याचे मा. तहसिलदार महोदयांनी शिष्ट मंडळाला आश्वासन दिले. याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाअध्यक्ष सुनिल पारसे,उपसभापती मारोती बेले, राष्ट्रवादीकाँग ्र ेस पक्षाच े विधानसभ अध्यक्ष मिलिंद हिवलेकर,मंगेश वानखेडे, संजय माहुरे,सुनिल तिमांडे, अमिल बाचले(उपतालुका शिवसेना सेलु तालुकअमित उमाटे, रामकृष्ण चांभारे, सतिश राऊत, प्रशांत कांबळे,सुधाकर बेसेकर, गणेश सुरकार, देवराव राऊत, आशिष राऊत,महादेव मुडे, अशोक उईके, मंगेशहांडे, परसराम गोमासे, विजयचन्ने व राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते धरणे मंडपात उपस्थित होते.