मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय राऊतांना “दे धक्का’; संसदेत हालचाली सुरू

नवी दिल्ली/प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विधान परिषदेसाठी आपल्या गटातील आमदाराचे नाव प्रतोद म्हणून सुचवल्यानंतर दुसरा मोठा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. शिवसेनेच्या संसदीय गटाच्या नेतेपदावरून उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्याऐवजी लोकसभा खासदार गजानन किर्तीकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. शिवसेना-शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला दिली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. राज्यात सुरू असलेल्याविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीयअधिवेशनात ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
निवडणूकआयोगाच्या निकालानंतर शिंदे गटानेविधीमंडळातील आणि संसदेतीलपक्ष कार्यालय ताब्यात घेतले आहे. उद्धव ठाकरेंना अडचणीतआणण्यासाठी शिवसेनेनं परिषदेतविप्लव बजोरिया यांची प्रतोद म्हणूननियुक्ती केली. विधानपरिषदेत उद्धवठाकरे आमदार आहे आणि सभागृहातप्रतोदचा व्हिप हा महत्वाचा असतो.त्यामुळे आता विप्लव बजोरियांचा व्हिप हा उद्धव ठाकरेंना मान्य करावालागणार का, अशी चर्चा सुरूअसताना दुसरीकडे दिल्लीतही शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे.संसदेतील शिवसेना पक्षकार्यालयातून उद्धव ठाकरे आणिआदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यातआले आहेत. त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत शिवसेनानेते आनंद दिघे यांचे फोटो लावण्यातआले आहेत. त्यानंतर आणखीएक धक्का ठाकरे गटाला देण्यातयेणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून संसदीयपक्षाच्या नेतेपदी संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. राऊत यांच्या ऐवजी गजानन किर्तीकरयांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसे पत्र संसदेच्या संबंधित समितीलादिले असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.