अखेर राज्य सरकार नमलं, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठे यश

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच हत्यार उपसले. या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. तर काही अंगणवाडी सेविका थेट रायगड किल्ल्यावर पोहोचल्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर आंदोलन केले. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतलाय. राज्य सरकारनं साडेपाच तर केंद्रानं गेली साडेचार वर्षे मानधनात कुठलीही वाढ दिलेली नाही. यासह अनेक मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित करण्यात आला. अंगणवाडी सेविकांसाठी गोड बातमी
अंगणवाडी सेविकां ंसा ेबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरु केली जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीची बैठक घेण्यात आली. सेविकांचे शिष्टमंडळ आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यात चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्र्याच्या आदेशाने ही बैठक झाली. या बैठकीत आज तोडगा काढण्याबाबत प्रयत्न झालेत. त्यात यशही आले.