मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार

मुंबई/प्रतिनिधी आज मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने विधानसभेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार यावर चर्चा झाली यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ मोदींना भेटणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. मराठी राजभाषा गौरव दिनी मुख्यमंत्री शिंदेंनी ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यांना त्याबाबत विनंती देखील करणार आहे.
सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येणार आहे. छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता. छगन भुजबळ म्हणाले की, कुसुमाग्रजांची आज जयंती आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेल्या १४ वर्षापासून आपण प्रयत्न करत आहे.अभिजात दर्जा मिळवण्यासाठीगरजेचे असणारे चारही निकषआपली मराठी भाषा पूर्ण करते. असे असताना देखील अद्यापमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. लवकरात लवकर हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्नकेले पाहिजे. आशिष शेलार म्हणाले की, आज मराठी भाषा गौरव दिनआहे. महाराष्ट्रासह हा दिवसजगभरात उत्साहात साजरा केला जातो. दिल्लीत या संदर्भात गोष्टी मांडल्या आहेत. यासाठी सर्वपक्षांनी एप्रिल महिन्यात यासंदर्भात दिल्लीला जाऊन भेट घेतलीपाहिजे.