होळीनिमित्त मोदींची करोडो शेतकऱ्यांना भेट; जाहीर केला किसान योजनेचा १३वा हप्ता

नवी दिल्ली/प्रतिनिधी होळीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील बेलगावी येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १३ वा हप्ता जारी केला आहे. पीएम किसानचा १२ वा हप्ता ऑक्टोबर २०२२ मध्ये जारी करण्यात आला होता. तर, ११ वा हप्ता मे २०२२ मध्ये देण्यात आला होता. मोदींनी बटण दाबून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २,००० रुपये हस्तांतरित केले. यामुळे ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये१६,८०० कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. पीएम किसानचा १३ वा हप्ता जारी केल्यानंतर उपस्थितांना संबोधितकरताना पंतप्रधान म्हणाले की, आज पीएम किसान सन्मान निधीचा आणखी एक हप्ता पाठवण्यात आला आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर हल्लाबोल केला.
काँग्रेसच्या काळात पैसा गायब होत होता. मात्र, आम्ही होळीच्या सणापूर्वी शेतकऱ्यांना ही भेट दिली आहे. जारी करण्यात आलेला हा हप्ता केवळ त्याच शेतकऱ्यांना मिळणारआहे. ज्यांची नावे योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्यायादीत आहे. काही कारणास्तव एखाद्या शेतख्याचे नाव यादीत समाविष्टनसेल तर, असे शेतकरी पीएम किसान हेल्पलाइन नंबरवर फोन करून मदत घेऊ शकता.