आज अभाविप चे युवारंभ जिल्हा विद्यार्थी संमेलन

वर्धा/प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वर्धा जिल्ह्याच्या युवारंभ विद्यार्थी संमेलनात येणाऱ्या छात्रशक्तीच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. दि.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी धुनिवाले मठ सभागृह येथे अभाविप वर्धा जिल्ह्याचे युवारंभ जिल्हा विद्यार्थी संमेलन होऊ घातलेले आहे , यात संपूर्ण जिल्ह्याभरातील विद्यार्थी शक्तीचे दर्शन वर्धेकरांना होणार आहे. युवारंभ कार्यक्रमाचे स्वागत समिती सचिव श्री. अविनाश देव आणि श्री. राणाजी रणनवरे यांच्या हस्ते शनिवारी कार्यक्रमाच्या पोस्टरचे विमोचन झाले. कार्यक्रमात उदघाटक म्हणून खासदार श्री. रामदास तडस तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रो
कब्बडीतील बंगाल वारियर्स समूहाचे खेळाडू आकाश पिकलमुंडे उपस्थित राहतील. या कार्यक्रमात नवीन शैक्षणिक धोरण २०२० व जी-२० अध्यक्षता आणि भारत या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांचे चर्चासत्र तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर वर्धा शहरात विद्यार्थ्यांची भव्य शोभायात्रा निघणार त्याचप्रमाणे कार्यक्रमातील सर्व प्रतिनिधीना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल अशी माहिती संमेलनप्रमुख विवेक चरडे यांनी दिली. हे संमेलन युवकांच्या नेतृत्वाचा नवा आरंभ आहे असे म्हणत जिल्हा संयोजक वैभव राऊत, जिल्हा संघटनमंत्री अभिषेक देवर, शुभम मुडे, हर्ष वानखेडे यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना निमंत्रित केले आहे.