एक लाखाच्या दारूसाठ़यासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा/प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दारूसाठ़यासह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस स्टेशन अल्लीपूरअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेव्दारे अवैध धंद्यांवरकारवाईची मोहीम राबवित असताना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनीनाकाबंदी केली. त्यावेळी शुभम नाईक रा. हिंगणघाट याच्याकडून एक लाख रुपयांवर दारूसाठा तसेच वाहन असा ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलिस अमलदारनीरंजन वरभे, रणजित काकडे, प्रदीप वाघ, अक्षय राऊत यांनी केली.