स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा; अजित पवार यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील शेतकरी संकटात असताना दुसरीकडे स्वत: सरकार स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा करतअसल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेतेअजित पवार यांनी केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारलाविविध मुद्यांवर घेरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. आज, विधीमंडळअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यातआलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकबहिष्कार घालत असल्याची घोषणा त्यांनी केली. सोमवारपासून, राज्याचे अर्थसंकल्पीयविधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी आज, विरोधी पक्षांनी आजअधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली.या बैठकीला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचेविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीम्हटले की, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फिरत असताना लोकांनी आपली कैफियत मांडली. शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नाही. शेतकरी आत्महत्येत वाढ होत असल्याकडेअजित पवार यांनी लक्ष वेधले.
वाढत्या महागाईमुळे शेती उत्पादन विरोधकांची मुस्कटदाबी? खर्च वाढला आहे. पण त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूरमधील शेतकऱ्याला कांदा विक्री केल्यानंतर अवघ्या दोन रुपयांचा चेक मिळाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यांला चांगला भाव सरकारने जाहीर करून निर्यात वाढवण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. आपला कांदा परदेशात गेला पाहिजे आणि सरकारला पवार यांनी या पत्रकार परिषदेत, विरोधी पक्षनेत्यांविरोधात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला, जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. आदित्य ठाकरे यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, या गोष्टीचे सरकारला गांभीर्य नाही का, असा सवाल पवार यांनी केला.
ठाकरे गटाच्या आमदारांवर एसीबीच्या माध्यमातून चौकशी लावली जात आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर छापे मारले जात असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. मग त्या एका आमदाराचा मनसे पक्ष होणार का? उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा पक्षपातीपणाचा असल्याची भावना लोकांमध्ये असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. ४० आमदार एका बाजूला असल्याने त्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. उद्या मनसेचा एक आमदार आहे. उद्या त्या आमदाराने पक्षावर दावा केल्यास त्यांचा पक्ष होणार का, असा प्रश्नही पवार यांनी केला. जिल्हा वार्षिक योजनेचे पैसे खर्च झालेले नाहीत. सरकारचं याकडे अजिबात लक्ष नाही. जिल्हा नियोजन समिती मधुन जी कामे होणे अपेक्षित होते मात्र ते झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे जाहिरातींवर ५० कोटी सरकारने खर्च केले आणि मुंबई महापालिकेने १७ कोटी रुपये सरकारने जाहिरातींवर खर्च केले आहेत. आपले हसरे चेहरे दाखवण्यासाठी ही उधळपट्टी सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नाही आणि दुसरीकडे महामंडळाच्या पानभर जाहिराती प्रसिद्ध होत आहे. हा प्रकार चिड आणणारा असल्याचे पवार यांनी म्हटले.