सेलूच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी द्या

सेलू /प्रतिनिधी शहरात दरवर्षी निर्माण होणारे पाण्याचे दुर्भिक्ष व नागरिकांची होणारी भंटकती थांबविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आ. डॉ. पंकज भोयर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आ. डॉ. पंकज भोयर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सेलू येथील पाणी पुरवठा योजनेबद्दल माहिती देत निवेदन दिले. सेलू शहर बा ेर नदीच्या तिरावर वसलेले असले तरी पिण्याच्या पाण्याची तोकडी व्यवस्था असल्याने दरवर्षी शहराला उन्हाळयात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. राज्य शासनाने ग्रापंचे रूपांतर नगर पंचायत मध्ये केले असून शहराची लोकसंख्या देखील मोठी आहे. अशा स्थितीत पिण्याच्या पाण्याची योजना जुनी असल्याने अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने बारामाही पाणी पुरवठा करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होत नाही. वाढती लोकसंख्या व जुनी पाणी पुरवठा व्यवस्था मोडकळीस आल्याने शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना आवश्यक आहे.
याबाबत नगर पंचायतच्यावतीने आला आहे. या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याची मागणी डॉ. भोयर यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
बोरधरणातून होणार पाणीपुरवठा नगर पंचायतच्यावतीने पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात प्रकल्पाची इंतभूत माहिती देण्यात आली आहे. बोरधरणातून शहरासाठी पाणी घेण्यात येणार आहे. तसेच शहरात चार ठिकाणी जलकुंभाची निर्मिती करण्यात येणार आहे. वडगाव रोड व टेकाडी येथे दोन स्वतंत्र तीन लक्ष लीटरच्या राज्यशासनाकडे ४३.३२ कोटी तर रेस्ट हाऊस जवळ २.८० लक्ष रुपयांचा नवीन पाणीपुरवठा या ेजन ेचा प्रस्ताव पाठविण्यात लीटरची व रेल्वे स्टेशन मार्गावर २.४० लक्ष लीटरची पाण्याची टाकी तयार करण्यात येणार आहे. बोरधरणातून पाणी आणण्यासाठी ५० अश्वशक्तीच्या दोन पंपाचावापर करण्यात येणार आहे.संपूर्ण शहरात ६४५४० मीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्याची समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे.