राज्यात वन औद्योगिक विकास महामंडळ सुरु करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता वन औद्योगिक विकास महामंडळ (एफआयडीसी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वन विकास महामंडळाच्या नागपूर येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, क्रीडा स्पर्धा व्यक्तीमधील निकोपतेला चालना देते. वन विकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांनी ही निकोपता कर्मचाऱ्यांना शिकवली आहे. लवकरच वन विभागाच्या आणि वन विभाग विरुद्ध वन विकास महामंडळ अशा विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. हे महामंडळ केवळ वन क्षेत्राच्या विकासासाठीच काम करीत नाही, तर वन विभागातील कर्मचाऱ्यांना एखाद्या कुटुंबाप्रमाणे मानत त्यांच्याही सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करीत आहे. वन विकास महामंडळातील खेळाडूंनी सर्वच स्पर्धांमध्ये यश मिळवावे.
वन विकास महामंडळातील खेळाडूंचे कौतुक यासाठी करावे लागेल की विदर्भातील उष्णतामान जास्त असतानाही ते मैदानी खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त करीत आहेत. एफडीसीएमच्या खेळाडूंचा चपळता व कार्यकतर्ृत्वाच्याबाबतीत चित्ता असा उल्लेख करीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करायचे असेल तर शारीरिक स्वास्थ्यही तितकेच महत्वाचे आहे. खेळांसोबत सांस्कृतिक कार्यक्रम देखील महत्वाचे आहे. त्यामुळे वन विकास महामंडळाने सांस्कृतिक महोत्सव देखील घ्यावे, असे आवाहन मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी केले. वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे. राज्यातच नव्हे तर देशात वन विभागाचे काय सर्वोत्तम ठेवण्याचे मोठे आव्हान सर्वांपुढे आहे. राज्यातील वनक्षेत्रात मोठी वाढ नुकत्याच आलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार २ हजार ५५० वर्ग किलोमीटरचे वनक्षेत्र महाराष्ट्रात वाढले आहे.
कांदळवनांमध्येह१०२ वर्ग किलोमीटरची वाढझाली आहे. त्यामुळेच केंद्रीयअर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीयअर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कांदळवन संवर्धनाची संकल्पनादेशभरात राबविण्याची घोषणकेली, असे वनमंत्री सुधीरमुनगंटीवार यांनी कार्यक्रमात गौरवानेनमूद केले. यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीयसंचालक विकास गुप्ता, मुख्यमहाव्यवस्थापक संजीव गौरमुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, प्रादेशिक व्यवस्थापक सुमितकुमार, विभागीय व्यवस्थापकए. आर. प्रवीण, नागपूरचेउपवनसंरक्षक भरतसिंह हाडा आदीउपस्थित होते.