आमदार दादाराव केचे यांनी केले तब्बल ११६०.४१ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

आर्वी/प्रतिनिधी आमदार दादाराव केचे यांनी आर्वी तालुक्यातील विविध गावात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जल जिवन मिशन या केंद्र सरकारच्या योजनेतून नळाव्दारे पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल ११६०.४१ लक्ष रूपयांच्या विकास कामांची भूमिपूजने केलीत. या भुमिपुजन कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार दादाराव केचे होते आणि सरीता गाखरे माजी अध्यक्षा जि. प. वर्धा, रार्जशी राठी माजी सदस्या जि. प. वर्धा,हनुमंत चरडे माजी सभापती पं. स. आर्वी, शोभा मनवर माजी उपसभापती पं. स. आर्वी, नितीन अरबट माजी सदस्य पं. स. आर्वी, अशोक तुमडाम माजी सदस्य पं. स. आर्वी तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
झालेल्या भुमिपुजनां मध्ये चांदणी (शिरपूर) येथे १२०.०१ लक्ष रुपए, मांडला येथे ५८.८५ लक्ष रुपए, जळगाव येथे १३३.२९ लक्ष रुपए, शिरपूर (बोके) येथे १०५ लक्ष रुपए, टाकरखेडा येथे ५१.२५ लक्ष रुपए, लाडेगाव येथे ३२.१९ लक्ष रुपए, ईठलापूर येथे ९७.९२ रुपये, हैबतपूर येथे २८.९७ लक्ष रुपए, कवाडी येथे ८३.८१ लक्ष रुपए, नांदोरा काळे येथे ४२.७६ लक्ष रुपए, दिघी – सायखेडा येथे १३६.१६ लक्ष रुपए, रोहना येथे ९३.२७ लक्ष रुपए, हुसेनपूर येथे ८४.९८ लक्ष रुपए तर आजनगाव – जांबुळधरा येथे ११५.९५ लक्ष रुपए किमतीच्या नळाव्दारे पाणी पुरवठा करणे यासाठी भुमिपुजने संपन्न झाली. या प्रसंगी राजुभाऊ पावडे, नागोराव कालोकर, देविदास शिरपूरकर, पंडीत भोंगाडे, शिवाजी पांडे, चंदू सांभे, मुकेशा मसराम, पवन बागळे, धनराज हिंगणेकर, अशोक गोळावे, दिनेशा कु?्हादे, सतीश इंगळे, रामाजी परतेकी, मधुकर नेहारे, हरिदास ढोबले, वासूदेव परतेकी, रमेशवर आवटे, बाबाराव तिरभाने, दादाराव चापली, शेख हरून, विनोद डांगे, राजू दुर्गे, सुधीर बोकडे, अरविंद मेर्शाम, रवींद्र माने, सारिका मदने, नंदा नेवारे, नंदा नागपुरी, सुधाकर मेर्शाम, सुलोचना शिंदे, दिवाकर पेठे, बाळासाहेब बोके, दिनेश दिनकर, रोशन राऊत, निलेशलेश गायकवाड, डॉ. पालीवाल यांच्यासह परिसरातील अनेक महीला पुरूषांची उपस्थिती होती.