शिवाजी डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊन नाचा- शिवशाहिर विभुते

वर्धा/प्रतिनिधी कुणी आज पर्यंत असे काही केले का की, आइर् साठी मी माझं सर्वच पणाला लावले. तर येथे असं कुणीच नसेल तो फक्त जिजाऊचा शिवबा होऊन गेला. पुन्हा शिवाजी होणे नाही. आता सर्वत्र अंधार पसरला आहे. उजेड फक्तच मावळे आणू शकतील. परंतु, नव्या पिढीत शिवाजींचे पोवाडे लोप पावत चालले असून आता मात्र महाराजांची मिरवणूक काढून, डिजेवर थिरकून दारू पिऊन धिंगाणा घालतात. परंतु, शिवाजी डोक्यावर घेऊन नाचण्यासारखा नाही तर डोक्यात घेऊन नाचणारा असल्याच े, शिवशाहिर प्रसाद विभूते यांनी आपल्या पोवाड्यातून सांगितले. स्थानिक शिवाजी चौकात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवार १८ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र परिवाराच्या वतीने वर्ध्यात यावर्षी पहिल्यांदाच पोवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवशाहिर प्रसाद विभुते व सहकार्यांनी सादर केलेले पोवाडे व शिवस्फूर्ती गीतांनी शिवभक्तांची मने जिंकली. शाहिर विभुते यांनी शिव इतिहासातील अनेक प्रसंग यथोचित मांडून झाला काळाचा काळ.. जिजाईचा लाल… धन्य माऊली ती पोटी जन्मला पुत्र… वीर झुंजार.. या पोवाड्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे येऊन गेले. अंधार फार झाला या देशाला शिवबाची जिजा पाहिजे… महाराष्ट्रावर प्रेम अफाट.. असे एकापेक्षा एक पोवाड्याचे सादरीकरण करून जणू शिवाजीच या धर्तीवर अवतरल्याची अनुभूती देत गेले. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, भाजपाध्यक्ष सुनील गफाट, डॉ. अभ्यूदय मेघे, राजेश सराफ आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र परिवाराचे दीपक चुटे, रुपेश भोयर, सचिन खंडारे, सोनू ठाकूर, रामू पांडे, नितीन शिंदे आदी शिवभक्तांनी परिश्रम घेतले.