छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती देवळी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी व भव्य मिरवणूक

देवळी/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज ३९३ वी जन्मोत्सव सोहळा स्वराज्य यांचा १९ फेब्रुवारी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवाजी महाराजांचा पाळणा, रांगोळी स्पर्धा. इंदिरा गांधी चौक इथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सोहळा समिती देवळीतर्फे विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले कार्यामाचे नियोजन अंकित टेकाडे, किरण ठाकरे, कार्तिक राऊत, प्रतीक घोडे, स्वप्नील कामडी, देवंश वानखडे,समीर शेख, सौरभ राऊत, सागर अव्हाड या सर्व सदस्यांनी आयोजन केले व मिरणुकीमध्ये जगदंब ढोल ताशा पथक देवळी यांची आपली कला सादर केली

तसेच देवळीतील जनता हायस्कूल, सृजन कॅव्हेट, मारिया इंग्लिश स्कूल, गुरुकुल विद्यालय निकेतन, ब्रह्माकुमारी व इस्कॉन देवळीच्या वतीने देवळीतील विविध झाकीचे सादरीकरण करण्यात आले. सर्व शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सर्वांनी सहभाग घेतला.