पंचधारा घाटावरील ५५ फुटाची मूर्ती बनली आकर्षणाचे केंद्र

पुलगाव/प्रतिनिधी येथील नागद्वार स्वामी भक्त मंडळाने पंचधारा घाटावर २.५ टन वजनाच्या ५५ फुट मूर्तीची स्थापना केली होती. ही मूर्ती भक्तांचे आकर्षण ठरत असून दरवर्षी येथे महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीही १८ फेब्रुवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मोक्षधाम येथील खुल्या जागेत या भव्य अशा शंकरजींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

दरवर्षी महादेवाला जाणारे व इतर भक्तांनी १२ फेब्रुवारी २०१२ ला या मूर्तीची स्थापना केली. त्यादिवशीपासून येथे महाशिवरात्रीला नागद्वार समितीद्वारा पूजाअर्चा व प्रसादाचे आयोजन केले जाते. याकरिता समितीचे अनुपकुमार भार्गव, प्रभू वानकर, विजय कावळे, मुरली डाबरे, अनिल अरोरा, अजर्ुन पूरेकर, प्रवीण रब्बेवार, अशोक आठबैले, प्रकाश खेडकर आदी सहकार्य करीत आहे. तसेच या मूर्तीची स्थापना झाल्यापासून रंगरंगोटीचे कार्य सूरज मदनसिंग ठाकूर हे करीत होते. गेल्यावर्षीही त्यांनी आकर्षक अशी रंगरंगोटी केल्याने या स्थळाला अलौकीक असे सौंदर्य प्राप्त झाले आहे.