छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्य भव्य चित्रकला स्पर्धा

वर्धा/प्रतिनिधी देशाचे लोकप्रीय प्रधानमंत्री मा. श्री. नरेन्द्रजी मोदी यांनी प्रत्येक खासदारांना आपल्या लोकसभा क्षेत्रात खासदार क्रीडा व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन मोठया प्रमाणात करण्याबाबत सुचना दिलेल्या आहे. त्या अनुषंगाने वर्धा लोकसभा क्षेत्रात खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-२०२३ आयोजीत करण्यात आलेले आहे.

खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-२०२३ अंतर्गत भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्य रविवार, दिनांक १९/०२/२०२३ ला सकाळी ०७.०० वा जिल्हा क्रीडा संकुल मैदान वर्धा येथे आयोजीत करण्यात आले आहे. खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-२०२३ अंतर्गत चित्रकला स्पर्धा करिता शाळेतील शिक्षकांनी व पालकांनी जास्तीत जास्त विद्याथ््रयांना व पाल्यांना संख्येने सहभागी करण्याचे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.

चित्रकला स्पर्धेमध्ये “”अ गट – वर्ग ०१ ते ०४ १.निसर्ग चित्र, २.पक्षी किंवा प्राणी, ३.सामाजिक संदेश पर चित्र, “ब गट – वर्ग ०५ ते ०८ १.बेटी बचाओ, बेटी पढाओ, २.स्वच्छ वर्धा, सुं.दर वर्धा ३.आझादी का अमृत महोत्सव “”क गट-वर्ग ९ ते पुढे १. आत्मनिर्भर भारत, २. भारत जागतिक विश्वगुरु बनन्याच्या दृष्टीने वाटचाल, ३. आझादी का अमृत महोत्सव, ४. कोरोना लसीकरण मध्ये भारत नं. १, येतांना चित्रकले करिता लागणारे सर्व साहित्य सोबत आणावे, आयोजका कडून फक्त चित्रकलासाठी पेपर पुरविल्या जाईल.

अधिक माहितीसाठी सर्वानी चित्रकला स्पर्धा संयोजक आशिष पोहाने-९८२३७२७४०७, विषालजाचक-७६२०५५७६२४, दिपक भुते – ९९२२४०८६७६, सहसंयोजक चंद्रकांत चामटकर-९८५०३०९०७८, वैभवतिजारे-७७७४०५९७९९, वैभवराऊत-९१५८९४८४८२, शादर्ुल वांदिले-९०२८२९८३०५ यांच्याशीसंपर्क साधावा.