शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय, मंत्र्यांनी दिले अधिवेशनात संकेत

राज्यातील शिक्षकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात केंद्रप्रमुखांच्या सगळ्या जागा भरल्या जातील. राज्यातील शिक्षकांसाठी राज्य सरकारने तसेच शिक्षक सेवकांना १६ हजार रुपये वेतन देणार आहोत, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत सुरु असलेल्या प्राथमिक शिक्षक १७ व्या अधिवेशनाचा शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते. त्याच्या हस्ते अधिवेशानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दीपक केसरकर बोलत होते. त्यावेळी ही मोठी घोषणा केली.
त्याचवेळी ते म्हणाले, यापुढे शिक्षकांच्या गाडीवर ढठ लिहिण्याबाबत परवानगी देण्याचा विचार सुरु आहे. केसरकर यांनी पुढे सांगितले की, यापुढे खुल्या गटाच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. तशी घोषणा शिक्षक अधिवेशनात केली. शिक्षकांवरील भार कमी करण्यात येणार आहे. शिक्षकांची अशैक्षणिककामे वगळण्याचा जीआर काढला आहे. आताडॉक्टरांच्या गाडीवर ऊठ असते त्याप्रमाणे शिक्षकांच्या गाड्यांवर ढठअसे लिहिण्याची परवानगी लवकरच देण्यात येईल, असे त्यांनीयावेळी संकेत दिलेत. राज्य सरकार शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी प्रयत्नशील असेल. मुलांसाठीअसलेल्या टा ॅयलेट ्सची सफाई याप ुढ ग्रामपंचायत करणार आहे. टॉयलेट्स आणि कंपाउंडसाठी ५९० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षक समितीचे स्थान आमच्याहृदयात आहे, असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले.