शिवजयंतीपूर्वीच कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार, नव्या राज्यपालांचा “या’ दिवशी शपथविधी?

मुंबई/प्रतिनिधी अनेक वादग्रस्त विधानांमुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्तहोत होता. तसेच राज्यपालांना हटवण्याची मागणीहीकरण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारीयांनी स्वतःहून आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असूनत्यांच्याजागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आलीआहे. यानंतर त्यांच्या शपथविधीची तारीखही निश्चितकरण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नवनियुक्त राज्यपाल बैसयांचा थपथविधी १७ किंवा १८ फेब्रुवारी रोजी होण्याचीशक्यता वर्तवली जात आहे.

याचाच अर्थ असा की,छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधानकरणारे आणि याचमुळं अडचणीत आलेले मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शिवजयंतीपूर्वीच अर्थात १९ फेब्रुवारीपूर्वीच महाराष्ट्रातून जाणार आहेत. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त विधानं केली होती. यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज तसेच गुजरातींचं समर्थन करताना महाराष्ट्राला कमी लेखल्याचं विधान त्यांनी केलं होतं.