आ. कुणावार यांनी केली २१५ बालिकांच्या नावाने पहिली गुंतवणूक

हिंगणघाट/प्रतिनिधी स्त्रीशक्ती आर्थिक सबलीकरण उपक्रमांतर्गत सरकार तथा डाक विभाग आता आपल्या दारी येऊन सुकन्या समृद्धी योजनेत आ. समीर कुणावार यांनी तालुक्यातील २१५ बालिकांचे खाते उघडून या योजनेत सहभागी केले. मोदी सरकारने महिला सबलीकरनाच्या दृष्टीने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. सुकन्या समृद्धी योजना ही बालिकांसाठी भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आ.कुणावार यांनी तालुक्यातील गरीब परिवारातील २१५ बालिकांना योजनेंतर्गत पहिला हप्ता प्रत्येकी २५० रुपये स्वतः जमा केला. गोरगरिबांचे कैवारी म्हणुन प्रसिद्ध असलेल्या आ. कुणावार यांनी विधानसभा क्षेत्रातील एकूण २ हजार तळागाळातील गरीब परिवारातील बालिकांना हा लाभ भेटावा, त्यांचा आर्थिक विकास व्हावा हाच हेतू असल्याचे आ. कुणावार यांनी सांगितले. मतदासंघातील सर्वच नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन आ. कुणावार यांनी केले आहे. आ. कुणावार यांच्या कृष्णाई यानिवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला वर्धाडाक विभागाचे अधीक्षक हरिबाबू वंदना,सहाय्यक अधीक्षक मोहन निकम, अनिता वानखेडे, पत्रकार अभिनय खोपडे, राजेंद्रराठी तसेच डाक विभागाचे श्रीवास्तव, ए. के.पोहाणे, संजय गुजरकर, कृणाल मून, संध्या मोरे, अंकित डंभारे, अक्षय नगराळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तसेच संचलन ए. के. पोहाणे यांनी केले. संध्या मोरे यांनी आभारमानले. याप्रसंगी सहाय्यक अधिक्षक मोहन निकम यांनी संपूर्ण सुकन्या समृद्धी योजनेची माहिती दिली.