मानोरा शिवारातील नदीमध्ये आढळला मृत वाघ

हिंगणघाट/प्रतिनिधी तालुक्यातील मानोरा शिवारातील पोथरा नदी परिसरात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ दिवसांपुर्वी नागरी (गौळ) या शिवारात वाघ मुक्त संचार करीत असताना परिसरातील नागरिकांना आढळला होता. आता तालुक्यातील पोथरा नदी परिसरात वाघ मृतावस्थेत आढळल्याने वन विभागाच्या कर्मचार्यांची झोप उडाली आहे. वनपरीक्षेत्रात वाघाचा मृत्यू कशाने झाला हे वन विभागाकडून अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तो वाघ मनोरा येथून वाहत आला असल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.