साहित्य संमेलनाला बाराशे पोलिसांची सुरक्षा!

वर्धा/प्रतिनिधी वर्धेत आयोजित साहित्य संमेलना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आयोजकांसह प्रशासन काम करीत आहे. उद्घाटन सत्राला येणार्या अति विशिष्ट नेत्यांच्या सुरक्षेला तडा जाऊ नये यासाठी पोलिस अधीक्षक नुरूल सहन गेल्या आठ दिवसापासून आढावा घेत आहेत. पोलिस अधीक्षक हसन यांनी ग. त्र्य. माडखोलकर सभागृहात पोलिस कर्मचार्यांना सुचना केल्या.

सकाळपासून १ हजार १२२ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक हसन यांनी दिली. साहित्य संमेलनातील सुरक्षेच्या दृष्टीने काल १ रोजी व २ रोजी ेशान पथकाने सुरक्षेची पाहणी केली. तसेच बंदोबस्ताकरिता वर्धा व नागपूर जिल्ह्यातील पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. नागपूर परिक्षेत्रातून अप्पर पोलिस अधीक्षक १, उपविभाागीय पोलिस अधीकारी ६, पोलिस निरीक्षक २८, सहाय्यक पोलिस निरीक्षक/ पोलिस उप निरीक्षक ८७, पोलिस अंमलदार ८००, गृहरक्षक दलाचे २०० जवान असे १ हजार १२२ तसेच क्यू.आर.पी., आर. सी. पी., ेशान पथक, बिडीडीएस पथकामार्फत बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्ताची रंगीत तालीमही घेण्यात आली.