जिल्हयात प्रत्येक खेळाच्या स्पर्धा होणे आवश्यक- खा. रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी तळागाळात खेळाचा प्रसार व्हावा, जिल्हयात खेळाचे वातावरण निर्माण व्हावे, खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळावे आणि राज्यात आपल्या जिल्हयातील खेळाडू स्पर्धेत टिकावा यासाठी प्रत्येक खेळाच्या स्पर्धा जिल्हयात व्हायला हव्या, कुस्तीकरीता सुध्दा यावर्षी खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा, ज्युनियर नॅशनल स्पर्धा वर्धा जिल्हयात होणार आहे. वर्धा जिल्हयात नॅशनल स्पर्धा होने अभिमानाची गोष्ट आहे. क्रांती क्रीडा मंडळ व्दारा फुटबॉल खेळाडूकरिता यंगस्टर प्रीमीयर लिग आयोजीत करुन एक चांगले कार्य केले आहे, जिल्हयात प्रत्येक खेळाच्या स्पर्धा होणे आवश्यक आहे, त्यामुळे खेळाडूंचा आत्मविेशास वाढतो असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.

क्रांती क्रीडा मंडल वर्धा व्दारा न्यु इंग्लिश हायस्कुल येथी मैदानावर यंगस्टर प्रीमीयर लीग अंतर्गत फुटबॉल स्पर्धेच उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, कार्यक्रमाला सुनिल पटेल, किर्तीध्वज सवाई, डॉ. मनिश जैन, प्रदिप बजाज, मिलींद भेंडे, काटकर सर, पंकज सायंकार, अविनाश सेलुकर, बाळा माउसकर, पवन राउत, अशोक कठाणे, प्रदिप तलमले, सुधिर पांगुळे, किशोर मिटकरी, आनंदराव कालोकार, श्रीकांत पब्बनवार, दादा शाह देवेन्द्र ढोबळे उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व स्पर्धा यशस्वी करण्याकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रांती क्रीडा मंडल वर्धा सर्व पदाधिकारी, सदस्य व फुटबॉल खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.