दसऱ्याच्या पर्वावर वाईट प्रवृत्तींना बाजुला सारूण चांगले विचार व आचार अंगीकारले पाहीजे- खा. रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी देवळी शहरात प्रत्येक जाती धर्माचे सण उत्सव एकत्र येवुन साजरे करण्याची एक चांगली व स्तुत्य प्रथा आहे, दसरा हा वाईट विचारांचा दुर करण्याचा सण आहे, आपणही आपल्या मनातील, कृतीतील वाईट गोष्टीवर मात करून विजय मिळवला पाहिजे. आपल्या मनातील वासना, द्वेष, मत्सर असुरांना नामोहरम केले पाहिजे. मनाचे सीमोल्लंघन केले पाहिजे, वाईट प्रवृत्तींना बाजुला सारूण चांगले विचार व आचार आपण अंगीकारले पाहीजे असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले. मिरननाथ यात्रा मैदान देवळी येथे दसरा उत्सव समिती देवळी व्दारा आयोजीत भव्य दसरा मेळावा खासदार रामदास तडस यांच्या उपस्थिीती संपन्न झाला.

यावेळी राजेश बकाने, माजी उपाध्यक्ष डॅा. नरेन्द्र मदनकर, माजी नगराध्यक्ष सौ. शोभा रामदास तडस, माजी नगराध्यक्षा श्रीमती सुचिता मडावी, माजी सभापती नंदकिशोर वैद्य, माजी सभापती मारोतराव मरघाडे, माजी सभापती मिलिंद ठाकरे, शरद आदमने, राहुल चोपडा, रवी कारोटकर उपस्थित होते. खासदार पुढे म्हणाले की, देवळी शहराच्या विकासासाठी भाजपा सरकारने भरपूर निधी दिला व त्यामुळे देवळी शहराचा विकास झाला, गेल्या आघाडी सरकारने अडीच वर्षात कोणतेही काम किंवा निर्णय घेतले नाही, आज युती सरकार शेतकरी व सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत आहे, राज्य सरकारने १०० रुपयात चना, खाद्यतेल, साखर रवा देण्याचा सामान्य नागरिकांना वाटप करण्याचा निर्णय घेतला, केन्द्र सरकारने शेतक-यांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत खात्यात रक्कम टाकली आहे. पंतप्रधान आयुष्मान भारत योजने अंतर्गत ५ लक्ष रुपयांचे आरोग्य कवच गरीब नागरिकांना दिलेले आहे.

केन्द्रसरकार व राज्यसरकारच्या शेतकरी व सर्वसामान्य हिताच्या निर्णयामुळे विकास होत आहे, तसेच राष्टनेता ते राष्टपीता सेवा पंधरावाडयात अनेक नागरिकांच्या समस्यांचे निराकरण झाले असल्याचे यावेही खा. तडस म्हणाले. यावेळी राजेश बकाने, माजी उपाध्यक्ष डॅा. नरेन्द्र मदनकर, माजी सभापती नंदकिशोर वैद्य यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अतुल कु-हडकर, प्रास्तावीक रवी कारोटकर व आभार शरद आदमने यांनी मानले. कार्यक्रमाला संगीता तराळे, कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनीता ताडाम, सुनीता बकाणे, संध्या कारोटकर, विजय गोमासे, डॉ. श्रावण साखरकर, अंकित टेकाडे, उमेश कामडी, मेहेर तडस व मोठया संख्येने देवळीकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.