खा. रामदास तडस यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांचा सत्कार

वर्धा/प्रतिनिधी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत आयोजित जेष्ठ नागरिक दिन कार्यक्रमात खा.रामदास तडस यांच्याहस्ते जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, संत लहानुजी महाराज संस्थानचे कार्यकारी संचालक सुरेश उपाख्य बाळासाहेब पावडे, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष जॉ.सुरेंद्र सिंग, जेष्ठ समाज सेवक तथा उद्योजक मोहनबाबू अग्रवाल यांची उपस्थिती होती. मुलांनी त्यांच्या वृध्द आई, वडीलांचा योग्यरितीने सांभाळ केला पाहिजे, असे मनोगत खा. रामदास तडस यांनी केले. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय व आधारवड जेष्ठ नागरिक परिवारच्यावतीने आयोजित जेष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात मान्यवरांच्याहस्ते वयाची ७५ वर्ष पुर्ण करणा-या सुरेश मांडळे, विठ्ठल गभने, मोतीराम डंभारे, गुलाब वखरे, संतोष उईके, हनुमान भोंगाडे या जेष्ठ नागरिकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली यांनी जागतिक जेष्ठ नागरिक दिनी ८० वर्ष पुर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना त्यांनी निवडणुक प्रक्रियेत मतदान करुन देशाची लोकशाही बळकट करण्याचे जे मोलाचे काम केले आहे. त्याबाबत त्यांचे आभार मानण्याकरीता निवडणुक आयुक्ताकडुन प्राप्त झालेले आभारपत्र दहा जेष्ठ नागरिकांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार समाज कल्याणचे विशेष अधिकारी अनिल वाळके यांनी मानले.