गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, माओवाद्यांना मोठा धक्का

गडचिरोली/प्रतिनिधी विलय दिवसाच्या दिनी माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. दोन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या दोन्ही माओवाद्यांवर एकत्रितपणे सहा लाखांचे बक्षीस होते. अनिल कुजूर (वय २६) आणि रोशनी पल्लो (वय ३०) असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचे नाव आहे. माओवाद्यांच्या कारवायांना कंटाळल्याने आत्मसमर्पण केले असल्याचे या दोघांनी सांगितले.