The post विदर्भाला उष्णतेच्या सर्वाधिक झळा, तापमान ४२ अंश सेल्सिअसपलीकडे appeared first on .
]]>वातावरणात उकाड्यासोबतच उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत. राज्यातील तापमानात झपाट्याने वाढ होत असून विदर्भाला तापमानाची सर्वाधिक झळ पोहचत आहे. अकोला, ब्रम्हपूरी या शहरांमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असतानाच इतर शहरातदेखील तापमान वाढायला लागले आहे. संपूर्ण विदर्भालाच तापमानाची झळ पोहचली आहे. जवळजवळ सर्वच शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशाच्या पलीकडे गेला आहे. उपराजधानी नागपूर येथेही तापमान ४१ अंश सेल्सिअस पलीकडे गेले. राज्यात हळूहळू तापमान वाढत असतानाच विदर्भात उष्णतेच्या झळ बसत आहेत.
राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव तर विदर्भातील बुलढाणा, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागपूर अकोला येथे तापमान कमालीचे वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून खासकरुन विदर्भ, मराठवाड्यातील तापमानात वाढ होत आहे. गुरुवारी अकोला येथे ४२ अंश सेल्सिअस तापमाननोंदवले गेले, तर शुक्रवारी ब्रम्हपुरीयेथे ४२.३ अंश सेल्सिअसतापमानाची नोंद झाली. दरम्यान,३१ मार्च, १ आणि २ एप्रिलला मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा येत्यादोन दिवसात वाहणार आहे तर ३१ मार्च, १ आणि २ एप्रिलला तरळक ठिकाणी पावसाचशक्यता हवामान खात्याने वर्तवलीआहे.